दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं बिगुलं वाजलेलं असताना, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला मंजुरी दिली आहे.
दिल्लीचे राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास होकार दिल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ED ने 21 मार्च 2024 ला पहिल्यांदा अटक केली होती. नंतर, CBI ने 26 जून 2024 रोजी केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली. सप्टेंबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना जामीन मंजूर केला. त्यानंतर केजरीवाल हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.