कोल्हापुर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची उद्या कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा मैदानावरती निर्धार सभा आहे. या सभेच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे फुटी नंतर कोल्हापुरात ही पहिली सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी योद्धा पुन्हा मैदानात, महाराष्ट्राचा इतिहास फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्यांचा नाही तर वेतनावर पाणी सोडणाऱ्यांचा आदर्श सांगतो, बाप बापच असतो. अशा पद्धतीचे भले मोठे पोस्टर लावण्यात आला आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत असून याची चर्चा आता सुरू झाली आहे.