क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना पार पडणार आहे. पण या सामन्यात कोल्हापूरचा लेझर लाईट शोचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचे अमित पाटील यांचा आशीर्वाद लाईट हा विश्वचषकाच्या फायनल मॅचमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.