कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टनेलला भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. डोंगराच्या मध्यभागी टनेलला भगदाड पडल्याची माहिती मिळत आहे. कोयना धरणातून जलविद्युत प्रकल्पासाठी घेऊन जाणाऱ्या टनेलला हे भगदाड पडलेलं आहे.
पावसाने दडी मारलेली असून धरण पूर्ण क्षमतेने अद्याप भरलेल नाही आणि यातच हे भगदाड पडल्यामुळे पाणी वाया जात आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा वाया जात आहे. भगदाड पडल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असल्याची माहिती मिळत आहे.