विधानसभेच्या निवडणुकीनंतर चर्चेत राहिलेला विषय म्हणजे 'लाडकी बहिण योजना' ही योजना बंद होणार असे विरोधक म्हणत होते. या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यातून परत घेणार अशी चर्चा सुरु होती. त्याच पार्श्वभूमीवर बालकल्याण मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
मंत्री आदिती सुनील तटकरे म्हणाल्या कि " आम्ही गेल्या तीन दिवसांपासून जानेवारीची डीबीटी प्रोसिजर चालू केली आहे.... आणि 2 कोटी 41 हजार लाखापेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळाला असून या महिन्यातील लाभसुद्धा मिळालेला आहे....
ज्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडायचं काम सुरु आहे, कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्तीने कोणाचा लाभ परत घेण्याच्या किंवा त्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. अशी आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.