व्हिडिओ

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासांत जाहीर होणार, महिला मतदार आणि महिलांसाठीच्या योजनांनी किती गेमचेंजर ठरवलं पाहणं महत्त्वाचं.

Published by : shweta walge

महाराष्ट्राच्या महानिकालाची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे आणि उत्कंठा वाढत चालली आहे, कारण आता काही तासांत राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मतदारराजाने दिलेला कौल देशभर गाजणार आहे. राज्यात सत्तांतराचं नाट्य देशभर चर्चेचा विषय ठरलं आणि त्यानंतर राजकीय गणितं बदलली. अनेक कार्यकर्ते आणि नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, ज्यामुळे पक्षांतरणाचं नाटक अधिकच रंगले.

पक्षांतरणाच्या या नाट्यात मतदार कुठेतरी विसरले गेले, पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारराजानं स्पष्ट संकेत दिले होते – "आम्हाला गृहीत धरू नका." यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा पाऊस पडला. महिला मतदार, नवमतदार, युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात आला.

तसेच, यावेळी सर्व पक्षांनी आपापल्या जाहिरनाम्यात महिला, महिलांसाठीच्या लाडक्या योजना आणि इतर विविध योजनांचा पाऊस पडणार असल्याचं आश्वासन दिलं. २० नोव्हेंबरला सर्व विचार करत, मतदानाच्या माध्यमातून मतदारांनी आपला निर्णय घेतला.

आता, मुख्य प्रश्न आहे: मतदारांचा कौल कुणाला मिळणार? मतदारांचा आवडता उमेदवार कोण असेल? आणि सर्वाधिक महिलांचे मतदान, महिला उमेदवार, तसेच महिलांसाठीच्या योजनांनी या निवडणुकीला किती गेमचेंजर ठरवले, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....