व्हिडिओ

Lalit Patil drug case : ललितच्या आईने केली सरकारकडे 'ही' मागणी

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 2 ऑक्टोबर 2023ला ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. अटक केल्यानंतर आता मुंबईत आणलं जाणार आहे. ललितच ताबा काही दिवस मुंबई पोलिसांकडेच राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता ललितच्या आई वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ललितला अटक झाल्यानंतर त्याचे आईवडिल माध्यमांसमोर बोलत होते. ललित आणि भूषणला सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी विनंती ललितच्या आईवडिलांनी केली आहे. ललित पाटील भविष्यात ड्रग्जच्या धंद्यात पडणार नाही असंही त्याचे वडील यावेळी म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा