बदलापूर रेल्वे स्थानकात रात्री उशिरा मोठा गोंधळ उडाला. सव्वा बारच्या सुमारास जोधपूर एक्सप्रेस बदलापुर स्थानकात थांबवण्यात आल्याने बदलापूर आणि कर्जतकडे जाणाऱ्या अनेक लोकल एका मागोमाग एक खोळंबल्या होत्या.
त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला. तब्बल एक ते दीड तास लोकल खोळंबल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या डब्यात चोरी झाल्याने प्रवाशांचे सामान चोरीला गेले. त्यामुळे एक्सप्रेसच्या डब्यामधील प्रवाशांनी दोनदा चैन खेचली. त्यानंतर या प्रवाशांनी एक्सप्रेस बदलापूर स्थानकात आल्यानंतर तिला थांबवली.
काही प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. अखेर त्यांची पोलिसांनी समजूत काढून एक्सप्रेस पुढे रवाना केली आणि त्यानंतर दीड ते दोन तासानंतर खोळंबलेल्या लोकल बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने रवाना झाल्या .मात्र या सगळ्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे मोठे हाल झाले.
जोधपूर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात थांबल्याने लोकल खोळंबल्या
चोरीच्या घटनेनंतर प्रवाशांनी दोनदा चैन ओढली
बदलापूर स्थानकात मोठी गर्दी आणि गोंधळ
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गाड्या उशिराने रवाना