लातूर महानगर पालिकेच्या तिकीट वाटपावरून भाजपा पक्षामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून तिकीट वाटप झाल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारला होता.
लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांची आघाडी तयार करत नामनिर्देशन पत्र दाखल करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. या भाजपच्या बंडखोर कार्यकर्त्यावर पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
पक्ष हित जोपासण्याच काम या कार्यकर्त्यांकडून झाले नाही आणि पक्ष शिस्त पाळली नसल्याने पुढील सहा वर्षासाठी बंडखोर कार्यकर्त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.