व्हिडिओ

Laxman Hake on NCP Sharad Pawar: OBC समाज तुतारीला मतदान करणार नाही, लक्ष्मण हाके यांची घोषणा

ओबीसी समाज शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही अशी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीडमधील एका सभेत केली आहे.

Published by : Team Lokshahi

ओबीसी समाज शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही अशी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीडमधील एका सभेत केली आहे. या विधानसभेत ओबीसींना किती तिकिटे हे जाहीर करा असं आव्हान लक्ष्मण हाकेंनी सर्वपक्षांना केलं आहे. ओबीसी समाज तुतारीला मतदान करणार नाही बीडमधील सभेत लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना महाराष्ट्राने खुप वेळा साथ दिली आहे. अनेक वेळा मुख्यमंत्री देखील केलं पण शरद पवारांनी कुटुंबाच्या पलीकडे या महाराष्ट्रामध्ये कोणाला संधी दिली नाही. कुटुंबाच्या पलीकडे आणि पाहुणे राऊळ्यांच्या पलीकडे कोणाला कारखाने दिले नाही विधानसभेची तिकिट दिलेलं नाही. त्याच्यामुळे शरद पवारांना आणि शरद पवारांच्या तुतारीला ओबीसी समाज मतदान करणार नाही. त्याच कारण म्हणजे आमच्या हिताचं कधी शरद पवार म्हणाले नाहीत आणि जरांगेंना ते सतत पाठिंबा देत आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू