राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं. आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेत.
राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत महाराष्ट्राला 21 मुख्यमंत्री मिळाले, त्यातील 7 जणांनी एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फडणवीस 3 वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.