या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हा बदल ग्राहकांचा खिसा कापतो, अथवा त्यांना मोठा दिलासा देतो. वर्षाअखेरीस ग्राहकांना महागड्या गॅस सिलेंडरने दणका दिला आहे. विशेषण म्हणजे केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.