व्हिडिओ

MVA Jode Maro Protest: मविआचं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन

मविआचं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाईल.

Published by : Dhanshree Shintre

मविआचं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे. 'गेट वे ऑफ इंडिया' येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाईल. सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मारकापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मविआच्या आंदोलनाला अद्यापपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आंदोलनात उपस्थित राहणार आहेत.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आंदोलन करणार आहेत. 'गेट वे ऑफ इंडिया' येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करून आघाडीचे नेते, कार्यकर्ते व शिवप्रेमी ‘गेट वे ऑफ इंडिया’कडे जातील. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज