उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. या महाकुंभाचे तिसरे आणि शेवटचे 'अमृतस्नान' आज झाले आहेत. महाकुंभात दररोज स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व असले, तरी अमृत स्नानाचे विशेष महत्त्व आहे.
अमृतस्नानाच्या दिवशी नागा बाबा आणि साधू-संत आपल्या शिष्यांसमवेत भव्य मिरवणुकीत गंगेत स्नान करतात. अमृतस्नान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी नागा साधूंचे सर्व आखाडे महाकुंभाला हजेरी लावतात. प्रयागराजमधील यंदाच्या कुंभमेळ्यातील नागा साधूंचे हे शेवटचे स्नान असेल