व्हिडिओ

Special Report | Mahayuti | Maharashtra CM | Shiv Sena - BJP वादात राष्ट्रवादीचे राजकारण

महाराष्ट्रात महायुतीला सत्ता मिळाली असली तरी मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री कोण होणार यावर राज्यात चर्चा जोर धरतेय.

Published by : shweta walge

महायुतीला राज्यात एक हाती सत्ता आली असली, तरी आता मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाल्याचं बोललं जातय. विशेष करून शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना महायुतीत शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमताचा आकडा आहे. अशाप्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा हा राष्ट्रवादीचा पहिलाच प्रयत्न नसून २०१४ला बाहेरून पाठिंबा देत, तर २०१९मध्ये पहाटेचा शपथविधी करत भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शह काटशह राजकारणावर सध्या राज्यात चर्चा जोर धरतेय.

एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस..? महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हाच प्रश्न प्रत्येक नेत्याला माध्यमातून विचारला जातोय. शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावी, अशा प्रतिक्रिया देतायत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा