आज आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपूर अधिवेशनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. येत्या 11 डिसेंबरला नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर या मंत्रिमंडळामध्ये 33 जणांचा शपथविधी होणार आहे.
याचपार्श्वभूमीवर संजय शिरसाट म्हणाले की, इतर मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज होणार नाही आहे आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होईल. त्यानंतर संध्याकाळी कॅबिनेट आहे. 12 किंवा 13 ला या मंत्रिमंडळचा विस्तार केला जाईल ज्यामध्ये मंत्र्यांचे शपथविधी पार पाडले जातील.
तसेच भरत गोगावले म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींनी जो वेळ दिला आहे तो कमी वेळ आहे त्यामुळे आज बाकीच्यांचे शपथविधी होण शक्य नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होईल आणि बाकीचे जे मंत्रीपद आहेत त्यांचा शपथविधी 11 ला होईल अशी त्यांनी शक्यता वर्तावली.