23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला ज्यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झालेला पाहायला मिळाला. तर यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न समोर उपस्थित झाला होता. अशावेळी अशी बातमी समोर आली होती की, नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाची पसंती दाखवल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधान आलं होतं, मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर देत सांगितले की त्यांचा या निर्णयाला पुर्ण पाठिंबा आहे आणि ते नाराज नसल्याचं त्यांनी सांगितल. तर यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे.
याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली महायुती महाराष्ट्रात चांगल्या मताधिक्यांनी विजयी झाली. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनता महायुतीचा शपथविधी सोहळा कधी पार पडतो याची वाट पाहत होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाचा समारोह सोहळा पार पडला जाईल.
तर 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा पार पाडला जाईल. यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेला खुप खुप शुभेच्छा देतो असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची वेळ आणि तारीख सांगितली आहे. तर आता या शपथविधीसह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे.