आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. कालपर्यंत 280 आमदारांनी शपथ घेतली तर आज उर्वरित 8 आमदार शपथ घेणार आहेत. राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून राहुल नार्वेकरांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या अधिवेशनाची आज सांगता होणार आहे आणि राज्यपाल राधाकृष्णनं हे विधानभवनात दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळ्यात राज्यपालांचं अभिभाषण सुरु होणार आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्यात आला होता, पण तरी देखील आता त्यांच अभिभाषण होणार आहे.