नवी मुंबईतील नेरूळ मधील एका लॉजवर वेश्या व्यवसायात मुली पुरवण्याऱ्या साहिल उर्फ शिराजुल मंडल याला पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीची पोलिस ठाण्यात चौकशी सुरू असताना महेश मांडोळे याच्या हलगर्जीपणामुळे नेरुळ पोलिस ठाण्यातून आरोपी मंडल पसार झाला होता.
या घटनेनंतरही महेश मांडोळे याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मांडोळेवर कारवाई न झाल्याने मांडोळे पुन्हा त्याचा वसुलीचा धंदा करतच होता. याच महेश मांडोळेने कोपरखैराणे येथील नटराज बारमध्ये पैसे उधळले होते. महेश मांडोळे याला वरिष्ठांकडून अभय मिळतंय.
मांडोळ ज्यांच्यासाठी वसुली करतोय, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. लोकशाही मराठीने हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणलं. याप्रकरणातील संबंधित वरिष्ठांवर ठोस कारवाई होण्याची आवश्यकता आहे.