धुळेकडेून-मालेगावकडे जाणारी लाल रंगाच्या कारमधून गांजा सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. MH 17:CX 3350 या गाडीमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सापळा रचत गाडीला ताब्यात घेतले आहे.गाडीतील संशयित चालकास पोलिस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली आहे. गाडीचा तपास करण्यात आला, तपासादरम्यान गाडीत सुमारे ५६ किलो गांजा सापडला आहे.या गांजाची किंमत सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये असल्याची माहिती मालेगाव ग्रामीण पोलीस उपअधीक्षक नितीन गनापुरे यांनी दिली आहे.