मुंबईतील दोन्ही पालकमंत्रीपदांवर शिवसेनेनं दावा केलाय. मात्र महायुती म्हणून शिवसेनेला मुंबईतील एकतरी पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी शिवसेना नेत्या मनीषा कायदेंनी केलीय. तसेच महायुतीमध्ये कुठेही रस्सीखेच नसल्याचंही कायंदेंनी सांगितलंय. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं पालकमंत्री पद महायुतीत कुणाकडे जातं हे पाहावं लागेल.