मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केलं होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून सगेसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते उपोषण करण्यात येत होते.
मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने 13 ऑगस्टपर्यत मागण्या मान्य कराव्या. मराठा समाजाच्या विनंतीनंतर रात्री सलाईन लावलं, सलाईन लावून उपोषण करण्यात काय अर्थ? असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.