मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी तब्बेत खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलंय. मनोज जरांगे यांना बोलायला त्रास होतोय. वैद्यकीय पथक उपोषणस्थळी उपस्थित असून मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत काळजी घेत आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगेंशी चर्चा करणार असून काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी जालन्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली.