माथाडी कामगार एक दिवसीय बंद पुकारणार आहे. महाराष्ट्रातील सर्व माथाडी संघटना सहभागी होणार आहेत. माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 34 मागे घेण्यासाठी बंद पुकारणार आहेत. विधेयक आल्यास 80 टक्के माथाडी कायदा मोडीत निघेल अशी भीती माथाडी संघटनांना असल्यानं बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, APMC, बंदरे,गोदाम, कंपन्यामधील कामगार सहभागी होणार आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात बैठक बोलावून माथाडी संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.