शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. दोन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात याप्रकरणांची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर याविषयीचा निकाल येण्याची शक्यता आहे. ही सुनावणी आज होणार होती मात्र आता ही सुनावणी पुढे ढकल्यात आलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षात फुट पडलेली आहे आणि या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरण समोर आलेलं आहे.
यानंतर विधानसभा अध्यक्षने निर्णय करावा असं कोर्टाने सांगितलं होत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षने सुनावणी ही घेतली बरेच दिवस ही सुनावणी चालली त्यामध्ये मात्र त्यामध्ये जो निर्णय समोर आला तो या पक्षांना मान्य नव्हता. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सुप्रीम कोर्टात गेले मात्र आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे.