व्हिडिओ

MLA Mahendra Dalvi Audio Clip कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया

अलिबागचे शिंदे गटाचेआमदार महेंद्र दळवी यांनी महावितरण अधिकाऱ्यावर केलेल्या दादागिरीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

अलिबागचे शिंदे गटाचेआमदार महेंद्र दळवी यांनी महावितरण अधिकाऱ्यावर केलेल्या दादागिरीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ऑडिओ क्लिपमधील समोरची व्यक्ती महेंद्र दळवी असल्याची माहिती आहे. महेंद्र दळवी आणि अधिकाऱ्यामधील ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नवा वाद उभा राहिला आहे. या कथित क्लिपमध्ये आमदार दळवी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. मार खाण्यापेक्षा बदली करून जा असंही आमदार दळवी म्हणत असल्याचे समोर येत आहे. तसेच मुरुडमध्ये अधिकाऱ्याकडून लोकांना त्रास देण्यात आल्याचे दळवी यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. यामध्ये अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा त्याला माझी पोर मारतील असं आमदार म्हणत असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हायरल क्लिपमुळे आमदार दळवींच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. तर लोकशाही मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी