ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत अविनाश जाधव यांनी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. मात्र आता राज ठाकरे त्यांचा हा राजीनामा स्विकारतात का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.