मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोकण जागर यात्रा आज निघते आहे. महामार्गावर पळस्पे फाटा येथून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण कोकणात एकूण आठ टप्प्यात पदयात्रा निघणार असून प्रत्येक टप्प्यात १५ किलोमीटरची पदयात्रा असेल. संध्याकाळी ६ वाजता कोलाड नाका इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने यात्रेची सांगता होईल.