कल्याणमध्ये KDMC रुग्णालयाच्या बंद ICU सेवेच्या निषेधार्थ मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. मनसेने ऑक्सिजन मास्क लावून हे आंदोलन केले आहे. ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडलेला आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या रुग्णालयातील ICU ची सेवा गेल्या २-३ वर्षांपासून बंद आहे आणि हे ICU बंद असल्याने रुग्णांना ठाणे आणि मुंबईला जावं लागत असल्याने इथल्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या जीवाचं काही बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या सर्वाचा निषेध करण्याच्या अनुषंगाने मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हातात सिलेंडर घेत आणि ऑक्सिजन मास्क लावत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी हे अनोखे आंदोलन केलं आहे. लवकरच हे ICU सुरु न केल्यास आणखी मोठं जन आंदोलन आम्ही करु असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
केडीएमसी रुग्णालयातील ICU २–३ वर्षांपासून बंद असल्यामुळे मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले.
मनसे कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन केडीएमसी मुख्यालयात ठिय्या दिला.
ICU बंद असल्याने रुग्णांना ठाणे आणि मुंबईला जावे लागते, ज्यामुळे जीविताला धोका वाढतो.
तातडीने ICU सेवा सुरू न केल्यास मोठे जनआंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला.