व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसे 10 जागा मागणार? शिंदे-राज ठाकरेंच्या बैठकीत काय ठरलं?

मनसेने जसे दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेची मागणी केली होती मात्र तुर्तास तरी शिवसेनेच्या वाट्याला असलेली दक्षिण मुंबईची ही जागा त्यांनी भाजपला देऊ केलेली आहे.

Published by : Dhanshree Shintre

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली दौरा केल्यापासून मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, याबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने राजकीय समीकरणांबाबत सस्पेन्स कायम आहे. अशातच मनसेनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची मागणी केलीय. परंतु, ही दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे असून त्यांनी ही जागा भाजपला देऊ केलेली आहे.

कारण भाजपचे राहुल नार्वेकर त्या मतदारसंघात तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी गेल्या १५ दिवसांमध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पाडले आहेत. तर शिर्डीच्या जागेसाठी मनसे इच्छूक असून भाजपने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास मनसे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा