मोदी सरकारनं मदरशांचा सौगात 2 लाखांवरुन 10 लाख एवढा केला आहे. वक्फ विधेयक औरंगजेबाची कबर नागरीकत्व सुधारणा कायदा अशा माध्यमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुस्लिम बांधवांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे रामनवमीच्या निमित्ताने मुस्लिमांच्या घरी सौगात-ए-मोदी पाठवण्यात आली होती.
आता मदरशांनाही सौगाद देऊन आपण मुस्लिमांच्या विरोधात नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे. अल्पसंख्याकांच्या विभागाच्या मार्फत झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत वक्फ बोर्डामध्ये असलेल्या राज्यातील 500 पेक्षा अधिक मदरसे आणि अल्पसंख्याकांच्या शाळांना हे अनुदान देण्यात येत आहे.