मुंबईच्या समुद्रात पुन्हा एकदा बोट अपघात झाला आहे. काल रात्री १२.०० ते १२.३० च्या सुमारास मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीला मोठ्या जहाजाने धडक दिली. या धडकेत तिसाई बोट उलटली, परंतु सुदैवाने त्या वेळी आजूबाजूला इतर बोटं असल्यानं बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले. त्याच्या मदतीने बोटीतील कोळी बांधवांचा जीव वाचवण्यात यश मिळाले. या अपघातामुळे मोठा प्रकार घडण्याची शक्यता होती, पण वेळेवर केलेल्या बचाव कार्यामुळे सर्वांचा जीव वाचला.