मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज 25 एप्रिलपासून मुंबईकरांसाठी बंद राहणार आहे. पुनर्बंधनीसाठी उद्या रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून जनतेसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. जुना एल्फिन्स्टन पुल पाडून नव्याने एल्फिन्स्टन उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे.
हा पुल शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर असा हा उड्डाणपुल असणार आहे. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात येणार आहे त्यासाठी वाहतूक विभागाने सर्वसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहतूकीची अधिसूचना जारी केली आहे.