मुंबईत आज तब्बल 41 गणपती बाप्पांचं आगमन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या दिमाखात या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. त्यारम्यान बाप्पाला पाहण्यासाठी तसेच आगमन सोहळा पाहण्यासाठी लालबाग परळ परिसरात आज मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आजचा शेवटचा शनिवार आणि उद्याचा रविवार आहे लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी त्यामुळे राज्यभरात तसेच मुंबईत आज मोठ्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे सकाळपासूनच पाहायला मिळत आहे.
तर दुपारनंतर बाप्पाच्या आगमनासाठी आज संपूर्ण लालबाग परळ तसेच मुंबईकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चिंचपोकळीचा चिंतामणी या बाप्पाचं देखील दुपारनंतर आगमन होणार आहे आणि त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात अशी लोकांची गर्दी याठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामुळे वाहतूक पोलीसांनी देखील वाहतूकीमध्ये काही बदल केले आहेत आणि काही पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून दिले आहेत.