व्हिडिओ

Munawar Faruqui : स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधान

स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने एक वादग्रस्त वक्तव्य केल आहे. मुनव्वरने कोकणी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधान केल आहे.

Published by : Team Lokshahi

स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने एक वादग्रस्त वक्तव्य केल आहे. मुनव्वरने कोकणी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधान केल आहे. नितेश राणे आणि मनसैनिक आक्रमक झाले. चुक लक्षात आल्यानंतर मुनव्वरने जाहीर माफी देखील मागीतली आहे. भाजप आणि मनसेच्या इशाऱ्यानंतर मुनव्वर फारुकीने आपला माफीनामा दिलेला आहे आणि त्यादरम्यान माफीनाम्याचा व्हिडियो देखील त्याने पोस्ट केलेला आहे. स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने त्याच्या एका शोमध्ये कोकणी माणसांबद्दल आक्षेपार्ह विधान केल असून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला.

यापार्श्वभुमीवर नितेश राणे म्हणाले, मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप याची जीभ जास्त परत वळवळायला लागली आहे. याला कोकणी माणसाची त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडि शोमध्ये टिंगल उडवायची असेल तर याला लवकरच मालवणी हिसका दाखवायला लागेल. याचसोबत ते म्हणाले, लोकांचा जर तू अपमान करायची हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापाला पाकिस्तानात पाठवायला आम्हाला वेळ लागणार नाही.

तर याचसोबत मुनव्वर फारुकी माफीनाम्यात म्हणाला, नुकताच माझा जो शो झाला त्यात कोकणबद्दल मी काही तरी बोलून गेलो ते खरं तर गर्दी पाहून आणि लोक पाहून त्यांच्यासोबत बोलण्या बोलण्यात माझ्याकडून बोललं गेलं. पण मी आता पाहिलं की आता माझ्या त्या बोलण्यामुळे काही लोकांना मी दुखावलं आहे. मला कोणाला ही दुखवायचं नव्हतं मी माझ जे काम आहे हसवायचं तेच करत होतो पण तरी माझ्या बोलण्यामुळे कोण दुखावलं गेल असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा