पुण्यात ज्या वेगाने प्रकल्पाची कामं व्हायला हवीत, त्या वेगाने होताना दिसत नाहीत असं म्हणत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोहोळांनी पुणे महापालिका प्रशासनाला घरचा आहेर दिल्यानंतर चंद्रकांत पाटील हे मोहोळ यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. यापुढे दर महीन्याला महापालिका प्रशासनाबरोबर मिटींग घेणार आहेत. मागील बैठकीत महापालिका प्रशासनाने काय आश्वासन दिली होती त्याचा आधी आढावा घेणार असल्याचं चंद्रकांत पाटल यांनी म्हटलं आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेला दोन नवीन अतिरिक्त आयुक्त मिळणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
पुणेकरांच्या प्रत्येक समस्येमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत आहोत. ही भावना या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त केली. प्रशासनाकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाला काही सूचना, आदेशही दिले आहेत. शहरातील अतिक्रमण, फुटपाथ स्वच्छ करणाचे विषय यासारख्या कामांचा आढावा घेण्यात आला असल्याचं मोहोळ म्हणाले.