महाविकास आघाडीतील नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवास स्थानी बैठक पार पडणार आहे. उद्या सकाळी साडे- अकरा वाजता ही बैठक असेल. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाईल. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरेल. बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील होणार आहे. दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडेल.