मविआच्या जागावाटपाच्या चर्चांना वेग येणार आहे, गणेशोत्सव संपताच विधानसभा जागावाटप चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर मविआच्या जागावाटपाची चर्चा आजपासून सुरु होणार आहे. आजपासून तीन दिवस जागावाटपांवर खलबतं होतील, जो जिंकेल जागा त्याची हाच जागावाटपाचा फॉर्म्युला असेल असं राऊतांनी सांगितलेलं आहे, तर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा फायदा मविआला झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्या जागा आहेत त्यातील 48 पैकी 30 पेक्षा जास्त जागा या मविआच्या आल्या होत्या, दरम्यान मविआचा विधानसभेचा फॉर्म्युला आता काय असेल या विषयी उत्सुकता आहे.
विधानसभेमध्ये मविआ स्ट्रॉंग पोझीशनमध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि अशामध्ये आता होणाऱ्या ज्या जागावाटप आहेत त्या नेमक्या कशा होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कशाप्रकारे रस्सीखेच होणार याकडे लक्ष आहे, तर आजपासून तीन दिवस मविआमध्ये जागावाटपाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.