विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवापासून नागपुरात सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यासह राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, अतिवृष्टी, राज्याची आर्थिक स्थिती, सरकारी विभागातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटना, निवडणूक व्यवस्थापनातील गोंधळ आदी मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनिती विरोधकांनी तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.
दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा गाजणार. विरोधी पक्षनेते पद जाहीर करण्याची मागणी केली जाईल. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न केंद्रस्थानी राहणार. शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेला विलंब हा मुद्दा सुद्धा गाजू शकतो. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजणार. कापूस आणि सोयाबीनच्या भावासाठी विरोधक आक्रमक गाजणार. निवडणुका पुढे गेल्याचा मुद्दा गाजणार. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सरकारला जाब विचारणार. नाशिकमधील तपोवनाचा मुद्दा गाजणार. पार्थ पवार, शिरसाटांचा जमीन घोटाळा, डॉ. संपदा मुंडे आत्महत्या आदी मुद्दे गाजणार.
शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, कापूस–सोयाबीन दर हे प्रमुख मुद्दे
राज्याची आर्थिक स्थिती आणि भ्रष्टाचारावर विरोधक आक्रमक
विरोधी पक्षनेते पदाचा वाद अधिवेशनात गाजणार
जमीन घोटाळे, संपदा मुंडे केस, तपोवन प्रकरणावरून सरकारला घेरणार विरोधक