293 प्रस्ताव विरोंधकांनी सादर केला तेव्हा मंत्री आणि अधिकारी विधानसभेत उपस्थित नव्हते. त्याचपार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी माध्यमासोबत संवाद साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्राच्या सरकारला जो सत्तेचा माज आलायं तो पुन्हा एखादा विधानसभेत पाहायला मिळालेला आहे. प्रशासन सुद्धा त्याच पद्धतीने वागत असल्याचे चित्र दिसतयं. आज आपण पाहिलं आम्ही जो 293 चा प्रस्ताव सादर केला होता. त्याला चार वाजल्यापासून चालू करण्याचं भूमिका घेतली आहे.लाडक्या बहिण, बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न असलेला प्रस्ताव जाहीर केले होते. परंतु अधिकारी आणि मंत्री नसल्याने अध्यक्षांना कामकाज तहकूत करावे लागले. हा एक प्रकारचा सरकारचा माज आहे हे स्पष्ट होत आहे. आम्ही बाहेरच्या बाहेर काम करु असे हे सरकार वागत आहे.त्याचा प्रत्यय आज आलेला आहे. "असे विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.