लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी आता ५०० रुपये हफ्ता मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, "लाडक्या बहिणींमध्ये आमचे सगळे पैसे गेलेत. त्यामुळे आता आमच्याजवळ विकासाला पैसे राहिले नाहीत. निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत. अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागे पडणार नाहीत अस चित्र आपण पाहत आहोत".
पुढे नाना पटोले म्हणाले की, "यांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने निवडणूकीमध्ये मागतील त्या लाडक्या बहिणींला आम्ही 1500 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं. आता आपण पाहतो आहे की त्याला नियम लावले गेले आहेत. आज जवळपास 8 लाख महिलांना कमी करण्याचं पापसुद्धा या ठिकाणी केल गेलेल आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलल आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते".