बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, बालाजी तांदळे, महेश केदार यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यावरच नाना पटोले आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सत्तेत बसणारे देखील यात सामील आहेत- नाना पटोले
याचपार्श्वभूमीवर नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललं काय आहे? हे सगळ्यांनाच माहित आहे. सगळे गुन्हेगार आणि सत्तेत बसणारे हे सगळे यात सामील आहेत. त्यामुळे तिथला कारभार कसा चालू आहे सगळ्यांनाच माहित पडलेलं आहे. गृहविभागाकडून ते माहिती घेऊन सर्वांना सांगत आहेत.
फिल्म सिटी देखील इथून जाईल अशी शंका- नाना पटोले
पुढे नाना पटोले म्हणाले की, सरकार बधिर का आहे? हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलेले नाही, तर बेईमानीने निवडून आले आहेत. आमचं कोणी ही वाकडं करू शकत नाही, हे त्यांना आता वाटू लागलं आहे. आमचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण आहे. या राज्यात सिनेअभिनेते देखील सुखरूप नाही. फिल्म सिटी देखील इथून जाईल अशी शंका येते, असं नाना पटोले म्हणाले आहेत.