अंबादास दानवेंची बजेटवर प्रतिक्रिया
"अजूनतरी सगळ्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करता असं दिसतंय की, महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलेलं नाही आहे. किसान क्रेडिट कार्ड कोणालाही मिळत नसताना त्यांची क्षमता वाढवली आहे. औषधाची ड्युटी कमी केली आहे. पण हे सर्व पाहता महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही, अशी परिस्थिती आहे". अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहेत
जनविरोधी बजेट नाना पटोलेची प्रतिक्रिया
"शेतकऱ्यांना बरबाद करण्याची व्यवस्था या देशांच्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळत आहे. निश्चित रूपाने आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी आहे. गरीब विरोधी आहे, महागाई कुठेतरी कमी करणार का? याच्याविषयी कोणतीही भूमिका मांडली आहे. दर महिना जीएसटीच्या माध्यमातून महागाई वाढवायची आणि सगळ्यांना लुटायचं हा बजेटचा उद्देश आहे. अर्थसंकल्पीय बजेट जनतेच्या विरोधातील आहे "जनविरोधी बजेट नरेंद्र मोदींच्या सरकारने आज मांडलेल आहे".नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहेत
पृथ्वीराज चव्हाण यांची बजेटवर प्रतिक्रिया
"भारतीय अर्थव्यवस्था विकासदर हा फार वेगाने मंदावत आहे. सहा टक्के आर्थिक विकासदरापर्यंत पोचत का नाही याबद्दल शंका आहे. मोदीसरकारला प्रश्न विचारचा आहे.की, २०४७ मध्ये भारत विकासित होणार यांचे स्वप्न दाखवत आहात. झाले तर सर्वांना आनंद होईल, परंतू "विकासित भारताची व्याख्या हे सरकार कधीच बोलत नाही" पृथ्वीराज चव्हाण प्रतिक्रिया दिल्या आहेत.