विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी करत आहेत. त्यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.
काल नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले. यापुढे भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल, असे विधान केले आहे.