कोणतरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार. ज्या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचे तिकीट दिलं, तसेच निवडणुकीसाठी १५ लाख रुपये दिले त्याचा भास्कर जाधवला विसर पडला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.