व्हिडिओ

अद्वय हिरे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

Published by : Team Lokshahi

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात 1 कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अद्वय यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अद्वय हिरेंसह त्यांचे मोठे बंधू माजी आमदार अपूर्व हिरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधी विद्यामंदिर आणि अदिवासी सेवा समिती या संस्थेच्या अनुदानाचा गैरवापर करून सरकारी रकमेचा आर्थिक अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरे कुटुंबियांविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू झाली असून सूतगिरणी कर्ज घोटाळ्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं अद्वय हिरेंची जेलमधून सुटका होणं आणखी कठीण झालं आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस