TURBHE STATION SKYWALK BLAZE CONTROLLED BY FIRE BRIGADE | NO CASUALTIES 
व्हिडिओ

Navi Mumbai Fire : तुर्भे स्टेशन परिसरातील स्कायवॉकला आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

Turbhe Skywalk: तुर्भे स्टेशनवरील स्कायवॉकला अचानक आग लागली. नागरिकांनी पळ काढला, अग्निशमन दलाने ताबडतोब परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

Published by : Dhanshree Shintre

तुर्भे येथील हुंडाई शोरूमसमोरील स्कायवॉकला अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी अचानक भडकलेल्या आगीमुळे पुलावरून जाणारे नागरिक घाबरून इकडेतिकडे धावपळ घालू लागले. आगीच कारण पुलाखाली असलेल्या ज्वलनशील वस्तूंना पेट घालणं असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जात आहे.

यामुळे स्कायवॉकवरील पादचारी वाहतुकीवर तात्पुरता बंदी घालण्यात आली असून, परिसरातील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी परिस्थितीवर ताबडतोब नियंत्रण मिळवलं.

आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं असलं तरी कोणताही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुलावरून जाणाऱ्या नागरिकांची उडाली तारांबळ पाहता परिसरातील दुकानदार आणि रहिवाशांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवत परिसरातील गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा