व्हिडिओ

Nawab Malik : BJPच्या विरोधानंतरही नवाब मलिक राष्ट्रवादीत; भाजपची प्रतिक्रिया

नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

Published by : Dhanshree Shintre

नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीने या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे. कारण नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा आहे. सूरज चव्हाण यांच्या दाव्याने भाजप-एनसीपीतील वाद चव्हाट्यावर आलेला आहे. भाजपचा विरोध असताना सुद्धा नवाब मलिक अजित पवारांसोबतच का? अशी चर्चा सुरु आहे. नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सांगितले होते तरीदेखील भाजपचा विरोध जुगारुन राष्ट्रवादीने नवाब मलिक हे राष्ट्रवादीतच असल्याचे सांगितले आहे. भाजप सूचना करु शकतं पण कोणाला पक्षात ठेवायचे आणि कोणाला नाही हा निर्णय अजित पवार यांचा आहे असही सांगून भाजपच्या सूचनेला एकप्रकारे किंमत देत नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य