व्हिडिओ

गडचिरोलीत नक्षली कारवाया घटल्या, पोलिसांनी कसे केले नेटवर्क उद्धवस्थ

गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील नक्षल भरतीत कमालीची घट झाली आहे... 5 वर्षांपूर्वी 85 असणारा टक्का आता 40 टक्क्यांवर आला आहे...

Published by : Team Lokshahi

गडचिरोलीच्या सीमावर्ती भागातील नक्षल भरतीत कमालीची घट झाली आहे... 5 वर्षांपूर्वी 85 असणारा टक्का आता 40 टक्क्यांवर आला आहे... गडचिरोलीत जिल्ह्यांत नक्षलींचा प्रभाव ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे...

गडचिरोली-गोंदिया या नक्षलग्रस्त भागातही नक्षलींना गेल्या वर्षांत मोठ्या हिंसक कारवाया घडवून आणता आल्या नाही. बंदचे आवाहन फुसके ठरले आहे. पाच वर्षांत पोलिसांनी 199 नक्षलवाद्यांना अटक केली आहे. 137 नक्षल्यांना विविध चकमकीत ठार केले. या काळात 91 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दिनटोला या अतिशय दुर्गम पहाडीवरील चकमकीत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह 27 नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला. त्यानंतर नक्षलवाद्यांचे नेटवर्क समाप्त झाले.

नक्षलींचा मोठ्या कारवाया

  • 2014 ते 2020 या 6 वर्षांत दरम्यान 21 पोलिस शहीद झाले.

  • 6 वर्षांत जवळपास 15 सामान्य नागरिकांना जीव गेला.

  • 2008 ते 2014 या दरम्यान 4 मोठ्या नक्षली हल्ले, त्यात 100 जवान शहीद

1 मे 2019 रोजी महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडाजवळ केलेल्या स्फोटामध्ये 15 जवान व एक वाहनचालक नागरिक शहीद झाले होते. ही या पाच वर्षांतील सर्वात मोठी पोलिस हानी होती. आता पोलिसांनी नक्षलवाद्यांपुढे आत्मसमर्पण, अटक आणि एन्काउंटर, हे तीन पर्याय ठेवले. परिणामी नक्षली कारवायात घट झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा