राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मोदी बागेतील कार्यालयात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हडपसर मतदारसंघाचे आमदार आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना चेतन तुपे म्हणाले की, मी आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी साहेबांकडे आलो होतो. काल साहेबांनी मला आजच्या भेटीची वेळ दिली होती. त्या त्या शाळांचा विकास कसा होईल याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. त्यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे.